नववर्षाचा पहिला दिन....... सरत्या वर्षाला निरोप देऊन ब्रम्ह मुहूर्तावर
निघालेली भटक्यांची टोळी....... हेमंत-शिशिरातला लोभसवाणा गार वारा....... एक-दोन
तास झोप मिळूनही भल्या पहाटेपासून सुरु झालेले गप्पांचे फड....... चुकून मागे
राहिलेला आणि मागच्या ट्रेनने एकटाच दिड तास 'बोअरिंग' प्रवास करून आलेला
ट्रेकमेट :)....... वाफाळता अमृततुल्य चहा....... गार रानवाऱ्याबरोबरच अंगावर
घेतलेली सूर्याची कोवळी किरणं....... दुरून डोंगराच्या पोटातून खेचून
काढल्यासारखा दिसणारा कोथळीगडाचा सुळका....... त्याच्या आतून खोदून काढलेल्या
पायऱ्यांच मनातलं अप्रूप....... दिवसभराचं भटक्यांचं विविध विषयांच
चर्चासत्र....... गडाचा जाणून घेतलेला रक्तरंजित इतिहास....... सो कॉल्ड
'थर्टीफस्ट पार्टीछाप' पब्लिकने केलेला कचरा साफ करून गडाची केलेली
स्वच्छता....... अन् डोंगरमित्रांसोबतचा अविस्मरणीय 'ट्रेकानुभव'.......
दोन
दिवसा पूर्वी कोथळीगड करायचं नक्की केलं. मावस भाऊ तन्मय अन् मी असे दोघेच
तोपर्यंत भिडू होतो, पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळ पर्यंत तन्मय, तेज, शैलेश,
अभिजित, विवेक अन् स्वप्निल मिळून सात जणं तयार झालो. सकाळी ४.२५ वाजता
सिएसटीहून निघणारी पहिली खोपोली लोकल पकडायचं ठरवून सगळ्यांना तसं कळवलं.
ठरल्याप्रमाणे स्वप्नीलने दादर, अभिजितने कुर्ला, मी-तन्मयने मुलुंड, तेजने
ठाणे अन् विवेकने डोंबिवलीहून ट्रेन पकडली, तेही ठरल्याप्रमाणे खोपोलीकडचा
सर्वात पहिला डब्बा, पैकी शैलेश ठाण्याहून तीच ट्रेन पकडण्यासाठी (खोपोली
लोकल नेहमीच फास्ट असते असे समजून :D ) प्लॅटफॉर्म नं. ५ ला जाऊन बसला,
अन् त्याची हि स्लो खोपोली चूकली. मग काय, एकटाच दहा मिनिटानंतरच्या कर्जतने
दिड तासाचा 'बोअरिंग' प्रवास करून आला, आम्ही मात्र पोट धरून हसून घेतलं.
सरत्या वर्षाला निरोप देण्याचे प्रत्येकाचे काही ना काही प्लान्स असल्याने
रात्रीची झोप एक-दोन तासाच्या वर कुणाची झालीच नव्हती, तरीही पायथ्याला
जाईपर्यंत गप्पांचे फड असे काही रंगले कि आत्ताच मस्त सात-आठ तास झोप काढून
आलेत. ट्रेकर्स लोकांचं एक बरं असतं त्यांना सोबत असलेला ट्रेकर
ओळखीचाच पाहिजे असं नाही, फक्त 'ट्रेकर' या वळखिनं त्ये जीवाचं मैतर होऊन
जातात.
कर्जतला
उतरल्यावर डेपोत जाऊन 'यष्टी'ची विचारणा केली, तर तास-सव्वा तासाने
आंबिवली 'यष्टी' होती, म्हणून मग टमटम करून आंबिवली गाठण्यावर शिक्कामोर्तब
झालं. पण निघण्याआधी चहा नाही घेतला तर पुढं जाणं निव्वळ अशक्यच ओ, म्हणून
मग मस्त वाफाळत्या चहाची फर्माईश सुटली, बरोबर टमटमवाल्या काकांनाही सामिल
करण्यात आलं. आंबिवलीत दुर्गपालांच्या घरी चहा नाश्त्याची सोय होते हि
माहिती काकांकडून मिळाली, मग नाश्ता तिथेच करायचं असं ठरवून आम्ही आगेकूच
केली. या तासाभराच्या प्रवासात इतिहास, राजकारण, महाराजांचे वंशज, भूगोल,
आजार-विकार, औषधनिर्मिती, भोंदूगिरी एक ना अनेक विषयांना उजाळा
मिळाला. तासाभरात गार वारा अंगावर घेत आंबिवलीत पायउतार झालो ते थेट
दुर्गपाल गोपाळ सावंत यांच्या घरासमोर. उतरताच पोह्यानबरोबरच पुन्हा चहाची
फर्माईश. मस्त चहा-पोह्यानवर ताव मारल्यावर अगदी सज्ज झालो. निघण्याआधी
दुपारच्या जेवणाचीही ऑर्डर सोडून आम्ही ध्येयाकडे वाटचाल सुरु केली.
प्रशस्त
डांबरी रस्त्याने काही अंतर चालून गेल्यावर जिथे डांबरी रस्ता संपतो अन्
कच्चा रस्ता सुरु होतो तिथे उजव्या बाजूस झाडावर कोथळीगडाकडे रस्ता
दाखवणारा एक अगदी छोटा बोर्ड लावला आहे. इथून पूढली वाट, दगड-मातीची, सोपी,
वळणावळणाची, घाटाची अन् दमछाक करणारी. साधारण अर्धा-पाऊण तास चालल्यानंतर
कोथळीगड दृष्टीस पडला. त्याचा डोंगराच्या पोटातून खेचून काढल्यासारखा
दिसणारा सूळका खूणाऊ लागला.
तिथून थोडं पूढे आल्यानंतर वाट खाली उतरू लागली व कोथळीगड दृष्टीआड गेला. मुख्य वाटेला मध्येच कुठे वळण तर नाही ना?,
असं वाटून तेज अन् मी दोन्ही दिशांना थोडं पुढे आणि मागे पाहून आलो, आणि
वाट योग्य असल्याची खात्री पटली. इथून साधारण अर्ध्या तासानंतर पेठ
गावाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. इथं एका झाडाच्या चौथऱ्यावर गडाकडे कडे
वाट दाखवणाऱ्या बाणाची खूण केली आहे. थोड्या वेळाच्या विश्रांतीसाठी
थांबलो, तिळाचे लाडू अन् खजूरांचा फडशा पाडला. रॉक क्लायंबर तेजने क्लायंबिंग अन् रोप संदर्भात काही बेसिक गोष्टी उलगडल्या.
गावात एका घरवजा हॉटेल मध्ये पुन्हा एकदा बिनदूधाचा काळा चहा झाला, अन् आम्ही पेठ गावातल्या रस्त्याने गडाची वाट चढण्यास सुरुवात केली. गावात पाण्याच्या व्यवस्थेसाठी एक पाईपलाईन थेट गडावरील पाण्याच्या टाक्यातून आणली आहे. हि पाईपलाईन गडावर जाणाऱ्या वाटेला समांतर आणली आहे. वाट दमछाक करणारी असली तरी झाडाझुडूपांतून जाणारी असल्याने आल्हाददायक होते.

साधारण
अर्ध्या तासाने आम्ही मुख्य दरवाजापाशी घेऊन जाणाऱ्या पायऱ्यानपाशी येऊन
पोहोचलो. मुख्य दरवाजाची बरीच पडझड झाली आहे. इथून डाव्या बाजूस पाण्याच्या
टाकांचे समूह लागतात. त्यांना समांतर वाटेने गेल्यास वाट जिथे उजवीकडे
वळते, तिथे सुळक्यात थोड्या वरच्या बाजूस आणखी एक छोटेखानी गुहा पहायला
मिळते. इथे येणाऱ्या वाऱ्याने क्षणभर स्तब्ध झालो. याच वाटेने गडाच्या
सुळक्याला प्रदक्षिणा करता येते.
प्रवेश द्वारातून समोरच दिसतात त्या कातळात खोदून काढलेल्या काही गुहा आणि मंदिर. सर्वात शेवटी आहे ती भैरोबाची प्रशस्त गुहा. या गुहेचे वैशिट्य म्हणजे आतील कोरीवकाम. छताला आधार देणारे खांब, आतील दरवाजा यावर अप्रतिम कोरीव काम केले आहे.
भैरोबाच्या गुहेपासून
पुन्हा मंदिरापाशी आल्यावर मंदिराच्या उजव्या बाजूस एक गुहा खोदलेली आहे,
तिच्यात उजव्या बाजूस पण पृष्ठभागापासून खाली एक पाण्याचं टाकं आहे. याच
गुहेत एक उर्ध्वमूखी भुयार आहे, प्रथमदर्शनी हे लक्षात येत नाही. या
भूयारातूनच गडावर जाण्यासाठी पायऱ्या खोदून काढल्या आहेत.
भुयारातून जाणाऱ्या पायऱ्या गुडघ्या इतक्या उंच, दमछाक करणाऱ्या असल्या तरी एकंदरीत हा प्रवास थ्रिलिंग आहे. भुयाराच्या मार्गावर शेवटी एक कातळात कोरलेला दरवाजा अन् उजव्या बाजूस गजशिल्प व शरभशिल्प कोरलेलं आहे. इथून काही पायऱ्या चढून गडावर पोहोचलो.
कोथळीगडाचा इतिहास - ट्रेकक्षितीज संस्था साभार
{औरंगजेबाने नोव्हेंबर १६८४ मध्ये अब्दुल कादर व अलईबिरादरकानी संभाजींच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. ’कोथळागड’ हा महत्त्वाचा असून जो कोणी तो ताब्यात घेईल, त्याचा ताबा तळकोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे राहणार्या लोकांना त्याने आपले नोकर म्हणून ठेवून घेतले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची नेआण करतात, हे कळताच अब्दुल कादर व त्याचे ३०० बंदूकधारी नोव्हेंबर १६८४ मध्येच गडाच्या पायथ्याशी पोहोचले. मराठ्यांनी त्र्यांना मागे हटवले, पण तरीही काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाज्याजवळ पोहोचले आणि त्र्यांनी ‘दरवाजा उघडा‘ अशी आरडाओरड सुरू केली. किल्ल्यावरील मराठा सैन्याला वाटले की आपलेच लोक हत्यारे नेण्यासाठी आले आहेत, म्हणून त्र्यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मोगल सैनिक आत शिरले मराठे व मोगल र्यांच्यात लढाई झाली. अब्दुल कादरच्या मदतीसाठी माणकोजी पांढरेही आले, झालेल्या लढाईत मोगलांना यश आले. दुसर्याच दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला, फार मोठी लढाई झाली. या लढाईत बाणांचा व बंदुकींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.या लढाईत किल्ल्यावरचा दारूगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गडावर जाणारी सामुग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारूगोळा व धान्य मिळेनासे झाले. दरम्यानच्या काळात अब्दुल कादरच्या मदतीला कोणीच न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली. वेढा टाकल्यानंतर दहा बारा दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिजखान याने आपला मुलगा अब्दुलखान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. अब्दुलखान तेथे पोहचला तेव्हा त्याची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदार नारोजी त्रिंबक र्यांनी तेथील खोरे रोखून धरले होते. येथेही लढाई झाली नारोजी त्रिंबक व इतर सरदार धारातीर्थी पडले आणि कोथळागड मुघलांच्या ताब्यात गेला. इहमतखानाने नारोजी त्रिंबकाचे डोके रस्त्यावर टांगले किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. औरंगजेबाने कोथळागड नावाचा असा कोणता गड अस्तित्वात आहे का? याची खात्री करून मगच अब्दुलखानाला बक्षिसे दिली. मुघलांनी गडाला ‘मिफ्ताहुलफतह‘ (विजयाची किल्ली) असे नाव दिले. फंदफितुरीमुळे मराठ्यांच्या हातून हा मोक्याचा किल्ला निसटला. गड परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न सुरू केले. डिसेंबर १६८४ मध्ये गडाकडे जाणार्या मुघल सैन्याला मराठ्यांनी अडवले. नंतर मऱ्हामतखानालाही ७००० मराठ्यांच्या तुकडीने अडवले. पण मराठ्यांना यश लाभले नाही. त्यानंतर एप्रिल १६८५ मध्ये ७०० जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला. २०० जण दोरीच्या शिडीच्या मदतीने किल्ल्यात उतरले. बरेच रक्त सांडले, पण मराठ्यांची फत्ते होऊ शकली नाही. मराठ्यांनी हा महत्त्वाचा किल्ला गमावला होता. पुढे १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये दुसर्या बाजीराव पेशव्याच्या वतीने बापुराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला. सुमारे १८६२ पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता.}
माथ्यावर पाण्याची दोन टाकं वगळता काही अवशेष नाहीत. गडमाथ्यावरुन भीमाशंकरकडील प्रदेश, सिद्धगड, गोरखगड, पदरगड, चंदेरी, प्रबळगड, इर्शाळगड, माणिकगड, माथेरान हा दूरपर्यंतचा मुलूख नजरेत येत होता. सह्याद्रीच हे रांगड रूप डोळ्यांत भरभरून घेतलं. आता सगळ्यांनीच बरोबर आणलेल्या ड्राय स्नॅक्सवर ताव मारला. थोडी विश्रांती घेऊन गडफेरी मारून अन् मनासारख्या फ्रेम्स click करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
गडमाथा चढून जायच्या आधी प्रवेश द्वारातून वर आल्यावर उजवीकडे गेल्यावर सपाट समतल जागा लागते, तिथे एक तोफ आहे, तोफेपासून अलीकडे काही अंतरावर काही 'थर्टीफस्ट पार्टीछाप' लोकांनी दारूच्या बाटल्या आणि काही बाटल्या फोडून टाकल्या होत्या, बहुदा सरत्या वर्षाला त्यांनी 'त्यांच्या पद्धतीने' निरोप देऊन नववर्षाचे 'स्वागत' (???) केले असावे. हा सर्व कचरा आम्ही गडमाथ्यावर जायच्या आधी प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून ठेवला होता, तो गड उतरताना बरोबर घेतला, अन् आंबिवलीत येऊन दुर्गपालांसमक्ष त्याची विल्हेवाट लावली.

गड उतरत असताना मनात काही गोष्टी तरळत होत्या....... नोव्हेंबर १६८४ चा रणसंग्राम, 'हर हर महादेव' च्या गर्जनेने दणाणून
सोडलेल्या दाही दिशा, शत्रूवर डागलेल्या तोफा, भाले-बाण यांचा दोहो बाजूंनी
बरसलेला पाऊस, सळसळत्या पात्याने जमीनदोस्त केलेले गानिमांचे देह,
बंदुकींच्या झडलेल्या फैरी, रक्ताचे वाहिलेले पाट, शेकडो मावळ्यांचे
बलिदान……. अन् या रक्तरंजित इतिहासाचा साक्षीदार कोथळीगड, आज बनलाय काही पार्टीछाप पब्लिकचा अड्डा. मराठ्यांच्या रक्तरंजित इतिहासाची
साक्षीदार असलेली त्यापैकीच ती एक तोफ आज अनुभवतेय या 'सो कॉल्ड' लोकांची
हि विकृती, दारूच्या बाटल्यांचा खच, फोडलेल्या बाटल्यांच्या काचा, उघड्या
डोळ्यांनी पहातेय वैभवशाली इतिहासाची अवहेलना, पण जिथे मोठ-मोठ्या बलाढ्य
आणि संरक्षित गड-दुर्गांची अशा विवंचेनेतून मुक्तता नाही, तिथे या छोटेखानी 'कोथळीगडास'
कोण विचारतो?.......
परतून आंबिवलीत येईपर्यंत चार वाजले होते. आता सणकून भूक लागली होती. दुर्गापालांकडे पोहोचताच झक्कास चिकन थाळी वर यथेच्छ ताव मारला अन् गप्पांच्या फडामध्ये पुन्हा एकदा रंगून गेलो, नववर्ष दिनी आणखी एक अविस्मरणीय 'ट्रेकानुभव' गाठीशी बांधला गेला होता.......