फाल्गुन शु. ६, शिवशके ३४१
"६. ५४ ची बदलापूर फास्ट ट्रेन पकडायची आहे. मिळेल ना?"
स्वतःलाच प्रश्न विचारात घाईघाईत गर्दीतून चालत होतो (पळतच होतो)…
दादरच्या मेन ब्रिजवर चिक्कार गर्दी…
"कुठून येतात एव्हडी लोक?" वैतागून स्वताशीच पुटपुटत…
इतक्यात गर्दीत ती दिसली, हळूहळू चाचपडत चालत होती…
"कुठून येतात एव्हडी लोक?" वैतागून स्वताशीच पुटपुटत…
इतक्यात गर्दीत ती दिसली, हळूहळू चाचपडत चालत होती…
तिला पाहिल, पण ट्रेन पकडायची होती… "जाऊ दे! जाईल ती कशीतरी"…
पुढे गेलो, परत मागे आलो…"कहा जाना है आपको?"… मी विचारलं…
"central line पे platform एक पे middle ladies"… मी तिचा हात धरून हळू हळू चालू लागलो,
वय साधारण ३०-३५ च्या दरम्यान, निळी साडी, काखेत bag, हातात सफेद लाल काठी…
"कहा जाना है आपको?"… मी विचारल… "मै ट्रेन मे सेल करती हुं, middle ladies अच्छा पडता है स्टेशन पे उतरके घर पे जाने को". नाव नाही विचारल, कुठे राहते नाही विचारलं… अश्या कितीतरी रोज या मुंबईत आपल्या अपंगत्वावर मात करत उदरनिर्वाह करत असतील, किती त्रास होत असेल त्यांना. पण निर्धाराने, हिमतीने सामोर्या जातात. आपण आपला थोडासा वेळ काढून त्यांना मदतीचा हात देऊ शकतो ना?
शेवटी middle ladies आला. हात सोडून तिला सांगितल "आ गया middle ladies"…
"thank you भैय्या" ...ती …
"वेलकम" म्हणत मी पळत सुटलो ७.१० ची कल्याण fast पकडायला…
- प्रविण शिंदे
- प्रविण शिंदे

life line...
ReplyDelete